एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील आणखी एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.
कोपरगाव शहरातील 60 वर्षीय महिलेला कोरोनाचा संसर्ग झाल्याने चार दिवसांपूर्वी तिला नगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी या महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. आज (दि.१४) पहाटे उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान, कोरोनामुळे जिल्ह्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वीच श्रीरामपूर येथील व्यक्तीचा उपचारादरम्यान पुण्यात मृत्यू झाला होता.
Post a Comment