एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : कोरोना विषाणु साथसाखळीचे आज सकाळी ५१ अहवाल आले असून, सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. त्यामुळे नगरमधील कोरोनाबाधितांचा आकडा १४ वर पोचला आहे.
पुणे प्रयोगशाळेकडून आज सकाळी हे अहवाल प्राप्त झाले. यामुळे खळबळ उडाली आहे. बाधित रुग्णांमध्ये दोन परदेशी, दोन मुकुंदनगर तर दोन संगमनेर येथील नागरिक असल्याचे प्रशासनाने सांगितले.. परदेशी व्यक्तींपैकी एक इंडोनेशिया आणि दुसरा जिबुटी येथील असून, बाधित व्यक्ती १७ ते ६८ वर्षे वयोगटातील असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.
Post a Comment