अहमदनगर : मुख्य जलवाहिनीला गळती; उपनगरात कमी दाबाने पाणीपुरवठा


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : शहर पाणीपुरवठा योजनेच्या नवीन मुख्य जलवाहिनीला (८१३ mm) विळद पंपिंग स्टेशन येथे मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली आहे. जलवाहिनी दुरुस्तीचे काम महानगरपालिकेमार्फत तातडीने सुरू करण्यात आले आहे. या
कामासाठी सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत पाणी योजनेवर शटडाउन घेण्यात आला आहे. त्यामुळे आज (दि.१५) रोटेशननुसार शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगर भागास कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post