अहमदनगर : जिल्ह्यात आज १३ नवीन रुग्ण आढळले


एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : जिल्ह्यात आज शुक्रवारी (दि.२९) तब्बल १३ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. सकाळी ९ अहवाल पॉझिटीव आल्यानंतर सायंकाळी पुन्हा ४ अहवाल पॉझिटिव आले आहेत.

घाटकोपरहून अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड येथे आलेले १, ठाणे येथून पारनेर हिवरे कोरडा येथे आलेला १, चाकण (पुणे) येथून ढोर जळगाव शेवगाव येथे आलेला १, संगमनेर २, निमगाव (राहाता) ४, असे ९ अहवाल सकाळी पॉझिटिव आले होते.

सायंकाळी प्राप्त अहवालात ४ व्यक्ती बाधीत आढळून आल्या आहेत. राशीन (कर्जत) येथील ५३ वर्षीय व्यक्ती बाधीत आढळली आहे. पुण्यास नोकरीला असणाऱ्या पत्नीस भेटून ही व्यक्ति गावी परत आली होती. घाटकोपर हून टाकळीमिया (राहुरी) येथे आलेल्या १७ वर्षीय मुलीला लागण झाली आहे. यापूर्वी बाधित आढळून आलेल्या महिलेची ती नातेवाईक आहे. निमगाव (राहता) येथील बाधीत महिलेच्या २० वर्षीय नातवाला कोरोनाची बाधा झाली आहे. सायन (मुंबई) येथून केलंगन (ता. अकोले) येथे आलेल्या ४० वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. सायन रुग्णालयात ड्रेसर म्हणून ते काम करत आहे.

दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत ११ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.


जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ११७
  • महानगरपालिका क्षेत्र - १८
  • अहमदनगर जिल्हा - ६०
  • इतर राज्य - २
  • इतर देश - ८ 
  • इतर जिल्हा - २९

एकूण स्त्राव तपासणी - २२७७
  • निगेटीव - २०९७   
  • रिजेक्टेड - २५    
  • निष्कर्ष न निघालेले - १५      
  • अहवाल बाकी - २१
(स्त्रोत: जिल्हा सामान्य रुग्णालय, अहमदनगर)

Post a Comment

Previous Post Next Post