अहमदनगर : आणखी ९ जणांना कोरोनाची लागण; जिल्ह्यातील बाधितांची संख्या ११२


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : जिल्ह्यात बाहेरून आलेल्या व्यक्तींमुळे कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे. गुरुवारी जिल्ह्यात शंभरी पार झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी तब्बल ९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

यात पारनेर (हिवरे कोरडा १), अकोले १, शेवगाव १, संगमनेर २ व राहाता येथील ४ जणांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची एकूण संख्या ११२ वर पोहोचली आहे. 

घाटकोपरहून अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड येथे आलेले १, ठाणे येथून पारनेर हिवरे कोरडा येथे आलेला १, चाकण (पुणे) येथून ढोर जळगाव, शेवगाव येथे आलेला १, संगमनेर २, निमगाव (राहाता) ४ असे रुग्ण आढळून आले आहेत. बाधितांमध्ये ४ पुरुष, ४ महिला आणि ४ वर्षीय लहान मुलगीचा समावेश आहे.

निमगाव येथील व्यक्ती यापूर्वीच्या बाधीत व्यक्तीच्या संपर्कातील आहेत. संगमनेर येथील ४० वर्षीय महिला रुग्णाला आजाराची लक्षणे जाणवत असल्याने ग्रामीण रुग्णालय संगमनेरने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवले होते.  ५५ वर्षीय पुरुषाला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने खाजगी रुग्णालयाने जिल्हा रुग्णालयात  पाठवले होते.  तेथे याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. घाटकोपर येथून पिंपळगाव खांड येथे आलेली महिला यापूर्वीच्या बाधीत रुग्णाच्या संपर्कातील आहे. चाकण येथून ढोरजळगाव येथे आलेला ३० वर्षीय युवक बाधीत झाला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post