अहमदनगर : जुळ्या मुलांना जन्म देणाऱ्या कोरोना बाधीत महिलेचा मृत्यू


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात काल जुळ्या मुलांना जन्म देणाऱ्या कोरोना बाधीत महिलेचा आज शुक्रवारी सकाळी ८-४५ वाजता मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.

या महिलेचे काल सिझरियन करण्यात आले होते. या महिलेने काल एक मुलगा आणि एका मुलीला जन्म दिला होता. दोन्ही बाळांची तब्बेत ठीक आहे. या महिलेला सीझरियन प्रसूती झाल्यानंतर आयसियू मध्ये ठेवण्यात आले होते. कोरोना बाधीत असलेल्या या महिलेला न्यूमॅटिक लक्षणे होती, असे नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी सांगितले. ही महिला मुंबईहून निंबळक येथे आली होती. त्यानंतर तपासणीत ही महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती. 

Post a Comment

Previous Post Next Post