अहमदनगर : संगमनेरमध्ये आणखी पाच कोरोना बाधित आढळले


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : येथील संगमनेर तालुक्यात आणखी ५ कोरोना बाधित रुग्ण वाढल्यामुळे उडाली आहे. आज शुक्रवारी सायंकाळी या व्यक्तींचे अहवाल प्रशासनाकडे दाखल झाले आहेत.
संगमनेर येथील १ तर संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील ४ जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे कोरोना बाधित यांची संख्या 49 झाली आहे. संगमनेर येथील १ तर धांदरफळ येथील चौघांचा बाधित व्यक्तींमध्ये समावेश असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने सांगितले. दरम्यान, इतर २३ अहवाल निगेटिव्ह आले असून आता अजून ५ व्यक्तींचा अहवाल येणे बाकी आहे.

Post a Comment

Previous Post Next Post