अहमदनगर : संगमनेरमध्ये आणखी दोन कोरोना बाधित; संख्या आता ५१ वर


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : संगमनेर येथील एक महिला आणि संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील चार असे ५ जण कोरोना बाधित आढळून आल्यानंतर अवघ्या काही तासातच आणखी दोन व्यक्ती बाधित असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे दिवसभरात जिल्ह्यात एकूण ७ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या आता ५१ झाली आहे.

नवीन अहवालानुसार बाधित व्यक्तीमध्ये २८ वर्षीय महिला आणि ५ वर्षीय मुलाचा समावेश आहे. हे दोन्ही बाधित धांदरफळ येथील आहेत. बाधित व्यक्ती या काल मृत झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईक आहेत.
दरम्यान, जामखेड येथील कोरोना बाधित २ व्यक्तींचा १४ दिवसा नंतरचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला आहे. दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे.

संगमनेर शहरातील काही भाग आणि धांदरफळ २२ मे पर्यंत हॉटस्पॉट क्षेत्र घोषित
संगमनेर शहरातील ईस्‍लामपुरा, कुरण रोड, बीलाल नगर, अपना नगर, पानसरे आखाडा, गुंजाळ आखाडा, पुनर्वसन कॉलनी, पावबाकी रस्‍ता, ज्ञानमाता विद्यालय परिसर, तसेच कुरण (संगमनेर तालुका) व मौजे धांदरफळ बु. (संगमनेर तालुका) हे क्षेत्र हॉटस्पॉट पॉकेट म्हणून व सदरच्‍या क्षेत्राच्‍या मध्‍यबिंदु पासुन जवळपास 2 कि.मी चा परिसर हा कोअर एरिया म्‍हणून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी घोषित केला आहे. या क्षेत्रातील सर्व आस्‍थापना, दुकाने, अत्‍यावश्‍यक सेवा, वस्‍तु विक्री इत्‍यादी शनिवार, दिनांक ९ मे रोजी सकाळी ०६ वाजेपासून ते दि.२२ मे, २०२० रोजी रात्री १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्‍याचे आदेश देण्यात आले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post