नगर शहरात गुरुवारी पाणी नाही; पाणी योजनेवरील वीजपुरवठा खंडित


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : एमआयडीसी उपकेंद्रामधील करंट ट्रान्सफॉर्मर (C.T.) नादुरूस्त झाल्याने आज (दि.६) शहर पाणी पुरवठा योजनेचा विज पुरवठा खंडीत झालेला आहे. त्यामुळे मुळानगर पंपींग स्टेशन येथुन होणारा पाणी उपसा पुर्णत: बंद पडलेला आहे. परिणामी उद्या गुरुवारी (दि.७) रोटेशननुसार शहराच्या मध्यवर्ती भागास होणारा पाणीपुरवठा होणार नसल्याचे महापालिकेने कळविले आहे.
दुरुस्तीसाठी पर्यायी ट्रान्सफॉर्मर बाभळेश्वर येथुन मागविण्यात येत असुन एमआयडीसी येथे ट्रान्सफॉर्मर बसविण्यास व विद्युत पुरवठा सुरू होण्यास मध्यरात्री २.०० वाजणार आहेत.
विज पुरवठा सुरू झाल्यानंतर पुर्ण क्षमतेने पाणी उपसा पुर्ववत होण्यास तीन ते चार तासाचा अवधी लागणार आहे.
त्यामुळे वितरण व्यवस्थेच्या टाक्या भरणे शक्य होणार नाही.
परिणामी उद्या गुरुवारी रोटेशननुसार शहराच्या मध्यवर्ती भागातील सिद्धार्थनगर, लालटाकी, दिल्लीगेट, चितळे रोड, तोफखाना, नालेगांव, कापड बाजार, आनंदी बाजार या भागास पाणी पुरवठा होणार नाही. या भागास शुक्रवारी (दि.८) पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.
शुक्रवारी रोटेशननुसार पाणी वाटप असलेल्या शहराच्या मध्यवर्ती भागातील झेंडीगेट, रामचंद्र खुंट, हातमपुरा, कोठला, माळीवाडा भागास शनिवारी (दि.९) ) पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर कारकसरीने करावा व महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post