एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : श्रीरामपूर मधील शिवाजी चौकात रविवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर पायी चालणाऱ्या महिलेला भरधाव ट्रकने धडक दिली. या अपघातत महिलेचा जागीच मृत्यू झाला. रोहिणी दीपक अरोरा (वय 30 रा. गोंधवणी) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
रोहिणी रविवारी सकाळी गोंधवणी येथून चौथाणी रुग्णालयात कामावर जात होत्या. त्यावेळी प्रभाग दोनमधून लोखंडी सळया भरलेला ट्रक वेगाने शिवाजी चौकात आला. ट्रकने रोहिणी यांना पाठीमागुन जोराची धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. नागरिकांनी त्यांना उपचारासाठी साखर कामगार रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक ताब्यात घेत ट्रकचालक किशोर साळवे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. रोहिणी अनेक वर्षांपासून चौथाणी रुग्णालयात स्वछतेचे काम करत होत्या. त्यांच्या मागे पती, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.
Post a Comment