भिंगार विजय लाईन चौकातील टपर्‍यांचे अतिक्रमण हटविण्याची मागणी


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
भिंगार, नगर-पाथर्डी रस्त्यावरील विजय लाईन चौकातील अनाधिकृत अतिक्रमण वाहतुक कोंडीला व अपघाताला कारणीभूत ठरत आहे. सदरील अतिक्रमण तातडीने हटविण्याची मागणी सुमितकुमार गुप्ता यांनी केली आहे.

भिंगार जवळील विजय लाईन चौकात प्रचंड प्रमाणात अतिक्रमण वाढले असून, त्या अतिक्रमणामुळे नागरिक त्रस्त आहेत. या अतिक्रमणावर आता विनापरवानगी अनधिकृत टपर्‍यांचे पक्के बांधकाम केले जात आहे. परंतु वडारवाडी ग्रामपंचायत याच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करते. हे अतिक्रमण राज्य महामार्गावर असल्याने येथील दुकानात येणारे ग्राहक रस्त्यावर वाहने लावत असल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन लहान-मोठे अपघात घडत आहे. याप्रकरणी दुकानदारांना सांगितले असता खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जात असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. तर सर्वसामान्य नागरिकांच्या कोणत्याही कृतीला कायद्याच्या चौकटीत मोजणारे ग्रामपंचायत अधिकारी, या प्रकरणावर तक्रार करूनही काहीही कारवाई करत नाही. तर जबाबदारी झटकत असल्याचा आरोप गुप्ता यांनी केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post