पॅकेजच्या मागणीवरुन मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला; काय म्हणाले उद्धव ठाकरे..


एएमसी मिरर वेब टीम
मुंबई :
करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत भाजपानं माझं अंगण रणांगण आंदोलन केलं होतं. त्याचबरोबर राज्य सरकारनं पॅकेजची घोषणा करण्याची मागणीही भाजपाकडून करण्यात आली होती. या मागणीवर रविवारी महाराष्ट्रातील जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षाचा नामोल्लेख टाळत समाचार घेतला आहे.

राज्यात करोनामुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आरोग्य आणि आर्थिक आघाडीवर डोकं वर काढलेल्या आव्हानाचा सामना सध्या राज्य करत आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी राज्य सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनाविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माहिती दिली.

राज्यातील परिस्थिती राजकारण करण्याची नाही. त्यामुळे माझ्याकडूनही राजकारण होणार नाही, पण नेत्यांनी राजकारण करू नये. पॅकेजची मागणी केली जात आहे. केंद्राकडून पॅकेज देण्यात आलं. पण ते पॅकेज उघडलं, तर त्यात काहीच नाही. तो फक्त रिकामा खोका निघाला. पॅकेज काय घोषित करायचं? जाहिरात करायची की मदत करायची. प्रत्यक्ष काम करायचं. पोकळं घोषणा करणारं आमचं सरकार नाही. पॅकेज घोषित कशाला करायचं? त्यापेक्षा सरकारनं प्रत्यक्ष मदत करण्याचं कामं केलं आहे. आतापर्यंत राज्यातून ४८१ ट्रेन सोडल्या आहेत. सहा ते सात लाख मजुरांची सोय केली आहे. राज्य ८० रेल्वेगाड्यांची मागणी करत आहे, पण आपल्याला ३० ते ४० गाड्या मिळत आहे. राज्यातील स्थिती राजकारणाची नाही, पण काहीजणांना परिस्थितीचं गांभीर्य कळालेलं नाही. मी कुणाविषयी बोलतोय, हे जनतेला कळालं असेल, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post