‘या’ राज्यात आत्ता आढळला पहिला रुग्ण


एएमसी मिरर वेब टीम 
सिलिगुडी : देशात करोनाग्रस्तांची संख्या वाढतच चालली आहे. महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात आणि मध्यप्रदेशसारख्या राज्यात करोनाचा विळखा वाढत आहे. त्यातच आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या सिक्कीम राज्यात शनिवारी करोनाचा पहिला रूग्ण आढळला आहे.

२३ मे रोजी सिक्कीममध्ये करोना बाधित रूग्ण आढळला आहे. राज्यातील हा पहिलाच रूग्ण आहे. दिल्लीहून परतणाऱ्या २५ वर्षीय तरूणाला करोनाचा संसर्ग झाला झाला आहे. आरोग्य विभागाचे सह सचिव पेम्पा शेरिंग भूटिया यांनी पत्रकारांना सांगितले की, २५ वर्षीय विद्यार्थाचे नमुने तपासणीसाठी सिलिगुडी येथील उत्तर बंगाल चिकित्सा महाविद्यालयात पाठवण्यात आले. शनिवारी त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर करोना झाल्याचं स्पष्ट झालं.

भूटिया म्हणाले की, विद्यार्थी दक्षिण सिक्कीममधील रबांग्लाचा असून त्याच्यावर सर थूतोब नामग्याल स्मारक रूग्णालयात उपचार सुरू आहेत. २५ वर्षीय तरूण दिल्लीमध्ये स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करत होता. गेल्या आठवड्यात खासगी बसने तो सिलिगुडीला आला होता. १९ मे रोजी त्याच्यामध्ये करोना व्हायरसची लक्षणे आढळून आल्यानंतर रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याचे स्वॅब तपासणीसाठी पाठवल्यानंतर त्याला करोना झाल्याचे समोर आले.

Post a Comment

Previous Post Next Post