देशात 24 तासात कोरोनाग्रस्तांची संख्या 7964 ने वाढली


एएमसी मिरर वेब टीम 
नवी दिल्ली : देशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात देशात 7964 रुग्ण आढळले आहेत. ही आतापर्यंतची रुग्णांच्या संख्येतली एका दिवसातली सर्वात मोठी वाढ आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1,73,763 वर पोहोचला आहे. देशात सध्या 86422 अॅक्टिव्ह रुग्ण असून 82370 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
Highest spike of 7,964 new #COVID19 cases and 265 deaths in the last 24 hours in India. Total number of cases in the country now at 1,73,763 including 86422 active cases, 82370 cured/discharged/migrated and 4971 deaths: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/990tyBfGPe
— ANI (@ANI) May 30, 2020

गेल्या 24 तासात 265 जणांचा मृत्यू झाला असून हा आतापर्यंतचा एका दिवसातील मृत्यूंचा उच्चांक आहे. त्यामुळे देशातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 4971 वर पोहोचली आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा दिवसेंदिवस झपाट्याने वाढत जाणारा आकडा हा चिंतेची बाब ठरत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post