एएमसी मिरर वेब टीम
मुंबई : राज्यात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आता आणखी एक चिंताजनक माहिती समोर आली आहे. करोनाविरुद्ध पहिल्या फळीत लढणाऱ्या पोलिसांना करोनाची मोठ्या संख्येनं लागण झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्यातील ११४ पोलिसांना करोनाचा संसर्ग झाला आहे. तर एका पोलिसाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यातील २३२५ पोलिसांना करोनाचा संसर्ग झाला आहे तर २६ पोलिसांचा करोना व्हायरसमुळे मृत्यू झाल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे.
करोनाविरुद्ध देशाच्या सुरू असलेल्या युद्धात प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून पोलीस, डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचारी आदी दिवसरात्रं आपलं कर्तव्य बजावत आहेत. आपण घरात सुरक्षित रहावं म्हणून जीव धोक्यात घालून देशभराती पोलीस उन्हातान्हात रस्त्यांवर बंदोबस्तास उभे आहेत. या पोलिसांना देखील करोनाने घेरले असून त्यांचा जीव देखील धोक्यात आल्याचे दिसत आहे.
Post a Comment