भाजप खासदाराकडून लॉकडाऊनचे उल्लंघन


एएमसी मिरर वेब टीम 
नवी दिल्ली : कोरोना संकटामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. त्यामुळे देशात सार्वजनिक ठिकाणे बंद करण्यात आले आहेत. असे असले तरी सत्ताधारी भाजप खासदराने लॉकडाऊनचे उल्लंघन केले आहे. खासदार आणि दिल्ली भाजप प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी क्रिकेट खेळायला निघाले आहेत.

खासदार मनोज तिवारी रविवारी हरयाणाच्या सोनीपत शहरात क्रिकेट खेळताना दिसले. त्यांनी यावेळी मास्कही घातले नव्हते. तसेच क्रिकेट खेळताना सोशल डिस्टसिंगचा चांगलाच फज्जा उडाला होता. या दरम्यान त्यांनी उपस्थितांना गाणेही गाऊन दाखवले. क्रिकेट खेळताना खासदार तिवारींनी एक व्हिडीओही ट्विट केला आहे. देव तुम्हाला सगळ्यांना चांगले आरोग्य देवो, सर्वांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहो अशी प्रार्थना त्यांनी केली आहे.
या घटनेचे फोटो आणि व्हिडेओ व्हायरल झाल्यानंतर सोनीपत प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. लॉकडाऊनचे नियम उल्लंघन केल्याप्रकरणी खासदार मनोज तिवारी यांनी कुठलेच स्पष्टीकरण दिलेले नाही. परंतु विरोधी पक्षांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post