एएमसी मिरर वेब टीम
मुंबई : कोरोना व्हायरसमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनचा फटका सर्व उद्योगांना बसला आहे. अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांचे पगार कापले आहेत. तर अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना राजिनामे द्यायला लावले आहेत. असाच फटका चित्रपट व टीव्ही इंडस्ट्रीला देखील बसला आहे. दोन महिन्यांहून अधिक काळापासून शूटींग बंद असल्याने या दोन्ही इंडस्ट्रींचं कोट्यवधींचं नुकसान झालं आहे. अद्याप शुटींग सुरू होण्याबाबतही काही ठोस निर्णय झालेला नाही.
शूटींग बंद असल्याचा फटका छोट्या कलाकारांना बसत असतानाच आता एका प्रसिद्ध अभिनेत्रीला देखील लॉकडाऊनमुळे मालिकेतून डच्चू देण्यात आल्याते समोर आले आहे. नागिण या प्रसिद्ध मालिकेच्या चौथ्.ा सिझनमधून निर्मात्यांनी प्रसिद्ध अभिनेत्री रश्मी देसाई हिची भूमिका कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. रश्मीचं मानधन जास्त असून ते सध्याच्या परिस्थितीत निर्मात्यांना परवडण्यासारखे नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. रश्मीने बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर लगेचच नागिण 4 या मालिकेसाठी शूटींग सुरू केलं होतं.
Post a Comment