अहमदनगर : माळीवाड्यात आणखी एक रुग्ण आढळला; जिल्ह्यात 5 बाधित


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : जिल्ह्यात रविवारी सकाळी पुना कोरोना  बाधित रुग्ण आढळून आले आहेत. नगर शहरासह राहता व कोपरगाव तालुक्यात पाच बाधित रुग्ण आढळून आले आहेत. नगर शहराच्या मध्यवर्ती भागातील माळीवाडा परिसरात आणखी एक रुग्ण आढळल्यामुळे या भागातील लोकांची संख्या बारा वर पोहोचली आहे.


  • आज जिल्ह्यात ५ नवीन रुग्ण.. तर २९ व्यक्तींचे अहवाल निगेटीव
  • राहाता तालुक्यातील निघोज निमगाव येथील ५० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण.
  • प्रवरा नगर येथील ३४ वर्षीय महिला आणि अकरा वर्षाच्या मुलाला कोरोनाची लागण.
  • घरातील नगर शहरातील पाचपीर चावडी येथील ४८ वर्षीय व्यक्तीला कोरोनची लागण. बाधित व्यक्तीच्या आला होता संपर्कात.
  • कोपरगाव तालुक्यातील धोत्रे येथील १४ वर्षीय मुलीला कोरोनाची बाधा.
  • जिल्ह्यातील १२ व्यक्ती झाल्या आज कोरोनामुक्त. 
  • आतापर्यंत जिल्ह्यातील १२१ कोरोनाग्रस्त बरे होऊन परतले घरी
  • आज कोरोना मुक्त होऊन घरी परतलेल्या मध्ये नगर शहरातील ०५, संगमनेर येथील ०२ राशीन (कर्जत) येथील ०२ नेवासा, राहता आणि अकोले येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे
  • जिल्ह्यात आता ८० अॅक्टि रुग्ण
  • जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २१२
  • (महानगरपालिका क्षेत्र ४७, अहमदनगर जिल्हा १०८, इतर राज्य ०२, इतर देश ०८ इतर जिल्हा ४७)


एकूण स्त्राव तपासणी  २९९४
निगेटीव  २६८४ 
रिजेक्टेड  २६ 
निष्कर्ष न निघालेले १८ 
अहवाल बाकी ५६

(स्त्रोत: जिल्हा सामान्य रुग्णालय, अहमदनगर)

Post a Comment

Previous Post Next Post