कोरोना चाचण्यांची संख्या वाढणार; जिल्ह्यात आज वाढले १७ रुग्ण


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
जिल्ह्यात काल (गुरुवारी) सायंकाळपासून आज (शुक्रवारी) सायंकाळी ६ वाजेपर्यंत रुग्ण संख्येत १७ ने वाढ झाली आहे. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता १३०२ इतकी झाली असून एकूण रुग्ण संख्या २७८८ इतकी झाली आहे. आज ५३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता १४३६ इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालय येथील कोरोना टेस्ट लॅबमध्ये आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढणार आहे. सध्या असलेली प्रतिदिन ३०० चाचण्यांची क्षमता आता प्रतिदिन १ हजार अशी होणार आहे. त्यासाठी आवश्यक असणारे एक्स्ट्रॅक्टर उपलब्ध झाले असून सोमवार पासून अधिक चाचण्या होऊ शकणार आहेत. याशिवाय, जिल्ह्यासाठी ५० हजार अँटीजेन किटसची मागणी नोंदविण्यात आली आहे. ते लवकरच प्राप्त होत असून मोठ्या प्रमाणात चाचण्या घेता येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रनेनी दिली.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये संगमनेर तालुक्यातील घुले वाडी १, जोर्वे १, शहरातील अभंग मळा १ आणि अशोक चौक येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ३ जण बाधित आढळले. त्यात, श्रीरामपूर २ आणि राहाता येथील १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या १० रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, श्रीरामपूर १, संगमनेर ७, मनपा १, राहाता १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

उपचार सुरू असलेले रुग्ण : १३०२

बरे झालेले रुग्ण : १४३६

मृत्यू : ५०

एकूण रुग्ण संख्या :२७८८

Post a Comment

Previous Post Next Post