एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : शहरामध्ये कत्तलीसाठी आणलेल्या गाईंची पोलीस पथकाने
छापा टाकून सुटका केली आहे. अहमदनगर शहरामध्ये पोलिसांनी या अगोदर अनेक वेळा
छापा टाकून देखील अशा घटना थांबायला तयार नाहीत. काल रात्री केलेल्या
कारवाईमध्ये पोलिसांनी बारा लाख रुपयांच्या 73 गाईंची सुटका केली आहे.
याप्रकरणी
अमन बाबु शेख (रा.केडगांव, नगर), अदली इक्बाल कुरेशी (रा.बाबा बंगाली,
झेंडीगेट), रिजवान मुस्ताक शेख (रा. झेंडीगेट), सलिम अकबर चौधरी
(रा.तपकीर गल्ली, नगर), नजीर अहमद शब्बीर कुरेशी (रा. झेंडीगेट ), बबलु
इस्माइल कुरेशी (रा.बेपारी मोहल्ला, नगर), फिरोज शमशेर शेख (रा.बेपारी
मोहल्ला, नगर) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे
झेंडीगेट
परिसरात जनावरे कत्तल करण्यासाठी डांबून ठेवण्यात आलेली आहेत व काही
जनावरांची कत्तल करुन त्यांचे मांसाची विक्री करण्यात येत आहे, अशी
माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर आज पहाटे पावणे तीनच्या सुमारास बाबा बंगाली येथील बंदीस्त चार पत्र्याच्या शेडमध्ये, झेंडीगेट परिसरातील
एका छोटा हत्ती टेम्पो मध्ये व एका रुममध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी
यांचे पथक व दोन पंचासह वेगवेगळया वेळी छापा टाकून एकुण १२ लाख ८६ हजार
रुपये किंमतीची ७३ गोवंशी जातीची गावरान, जर्शी गोवंशीय गायी कालवड,
वासरे व ५०० किलो गोवंशीय मास, एका गाडी, कुऱ्हाड, चाकू, सत्तुर असा
मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील
यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, पोलीस
निरीक्षक प्रविण लोखंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही.ए.पवार यांच्यासह
सतिश शिरसाठ, कोतवाली पोलीस ठाणे व दंगल नियंत्रण पथक यांनी केली.
Post a Comment