महापालिकेची मुख्य जलवाहिनी फुटली; सोमवारी पाणी नाही


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
महापालिकेच्या पाणी योजनेवरील शहराला पाणीपुरवठा करणारी नवीन मुख्य जलवाहिनी विळद पंपींग स्टेशनजवळ रविवारी (दि.19) पाण्याच्या व हवेच्या दाबाने फुटल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.  महापालिकेने भरपावसात दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. मात्र, यामुळे शहराच्या पाणीपुरवठा वेळापत्रकात बदल झाला असून, उद्या सोमवारी (दि.20) शहर व उपनगरात पाणीपुरवठा होणार नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
आज (रविवारी) स्टेशनरोड परिसरात पाणीपुरवठा झालेला नाही. या भागात उद्या नेहमीच्या वेळेत पाणीपुरवठा होणार आहे. सोमवारी पाणीवाटप असलेल्या शहराच्या मध्यवर्ती भागातील झेंडीगेट, रामचंद्र खुंट, हातमपुरा, कोठला, मंगलगेट, कचेरी, माळीवाडा या भागासह सावेडी उपनगरातील गुलमोहोर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, प्रेमदान हडकोे, टिव्ही सेंटर व बुरूडगाव रोड परिसरात पाणीपुरवठा होणार नाही. या भागात मंगळवारी (दि.21) पाणी सोडले जाणार आहे.
मंगळवारी पाणी वाटप असलेल्या सिद्धार्थनगर, लालटाकी, दिल्लीगेट, चितळे रोड, तोफखाना, नालेगाव, आनंदी बाजार भागात बुधवारी (दि.22) पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे मनपाकडून कळविण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post