अहमदनगर : जलवाहिनी फुटल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत


एएमसी मिरर  वेब टीम
अहमदनगर : शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी सोमवारी (दि.27) सकाळी विळद गावात फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरू झाली आहे. महापालिकेकडून दुरुस्तीचे काम सुरू असून, त्यात व्यत्यय येत असल्याने दुरुस्तीला विलंब होत आहे. परिणामी, नगर शहर व उपनगराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

दुरुस्तीमुळे पाणी उपसा बंद असल्याने शहराच्या उपनगरात पाणी पुरवठा करणे शक्य होणार नाही. तसेच वितरण व्यवस्थेच्या पाण्याच्या टाक्या भरणे शक्य होणार नाही. त्यामुळे सोमवारी शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच मंगलगेट, रामचंद्र खुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, माळीवाडा, कोठी व गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हडको, प्रेमदान हडको, म्युनिसीपल हडको, सारसनगर, बुरुडगाव रोड, मुकुंदनगर इत्यादी परिसर पाणीपुरवठा झालेला नाही.या भागात  आज (दि.28) पाणी सोडण्यात येणार आहे.

तसेच रोटेशननुसार आज पाणी वाटप असलेल्या शहराच्या मध्यवर्ती भागातील सर्जेपुरा, तोफखाना, सिध्दार्थनगर, लालटाकी, नालेगाव, माळीवाडा (काही भाग), चितळे रोड, कापडबाजार, तोफखाना व सावेडी, बालिकाश्रम रोड परिसर, कल्याण रोड परिसर, स्टेशन रोड, विनायकनगर, आगरकर मळा या परिसरात बुधवारी (दि.29) पाणीपुरवठा होणार असल्याचे मनपाकडून कळविण्यात आले आहे. दरम्यान, या महिन्यात दुसर्‍यांदा जलवाहिनी फुटल्याची घटना घडली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post