एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : बालगृहातील बारा वर्षीय मुलाच्या मृत्यूप्रकरणी येत्या २७ जुलैला दंडाधिकारीय चौकशी होणार आहे. या मुलाच्या मृत्यूबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी २७ रोजी चौकशीच्यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नगरमधील स्नेहआशा विशेष बालगृहातील आरमान बहादुर पटेल या बारा वर्षीय मुलाचा ६ फेब्रुवारी २०२० रोजी मृत्यू झाला आहे. या मृत्यूची दंडाधिकारीय चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी श्रीनिवास अर्जुन यांची दंडाधिकारी चौकशीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. या मुलाच्या मृत्यू कारणांची चौकशी करण्यासाठी २७ जुलै २०२० ही तारीख निश्चित केली आहे. ज्या कोणास या घटनेसंबंधी माहिती, पुरावे आणि दंडाधिकारीय चौकशीस उपयोगी पडेल, अशी माहिती द्यावयाची असेल त्यांनी उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात या दिवशी सकाळी ११ वाजता उपस्थित राहून लेखी माहिती सादर करावी तसेच माहिती सादर करताना माहिती देणार्याचे नाव, वय, पूर्ण पत्ता आणि संपर्क क्रमांक व लेखी माहिती देताना स्वतःची स्वाक्षरी करावी, मृत्यूसंबंधीच्या बाबी आणि दृश्याच्या बाबीचा सविस्तर मजकूर असावा, असे उपविभागीय दंडाधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी स्पष्ट केले आहे.
Post a Comment