एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : जिल्ह्यातील व नगर शहरातील कोरोना परिस्थिती संदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांशी ऑनलाईन संवाद साधून आढावा घेतला आहे. जिल्ह्यातील शेती, खते-बियाणांबाबतही त्यांनी प्रा.शशिकांत गाडे यांच्याकडून माहिती घेतली.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात व शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. दररोज 100 पेक्षा अधिक रुग्ण वाढ आहेत. तपासणी अहवालांना विलंब होत आहे. चार-पाच दिवसांनंतर अहवाल मिळत असल्याने कोरोना बाधित रुग्णांकडून इतरांना संसर्ग होण्याचा मोठा धोका आहे. तपासणीबाबत उपाययोजना करुन लवकरात लवकर तपासणीसाठी सूचना द्याव्यात, असे प्रा. गाडे यांनी सांगितले.
शेती संदर्भातील समस्यांचीही त्यांनी माहिती दिली. जिल्ह्यात खताचा तुटवडा आहे. शेतकर्यांच्या रांगा लागत आहेत. तर दुसरीकडे सोयाबीण बियांच्या पेरणीनंतर पीक न उगवल्याने शासनाने नुकसान भरपाई मिळावी, अशी शेतकर्यांची मागणी आहे. तसेच दूध उत्पादक शेतकर्यांकडून दरवाढीची मागणी केली जात असल्याकडेही प्रा. गाडे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचे लक्ष वेधले.
Post a Comment