वीज बिल वसुली वाढवा; उर्जा मंत्र्यांचे महावितरणला आदेश


एएमसी मिरर वेब टीम
मुंबई :
कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधित क्षेत्रातील वीजबिलांची वसुली वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आदेश ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत. एकत्रित वीजबिल एकरकमी भरणाऱ्या ग्राहकांना २ टक्के सवलत, याशिवाय तीन समान हप्त्यात वीजबिल भरण्याच्या सुविधेबाबत माहिती देऊन ग्राहकांच्या शंकांचे समाधान करून त्यांना वीजबिल भरण्यास प्रोत्साहित करण्याचेही त्यांनी सुचवले आहे. कोरोना संकटाने आधीच हैराण झालेल्या जनतेला आता वीज बिल वसुलीचे आदेश दिले गेल्याने आणखी अडचणींचा सामना मात्र यामुळे करावा लागणार आहे.

मुंबईत महावितरणची आढावा बैठक ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी नुकतीच घेतली. कोरोना विषाणू संसर्गाच्या आपत्तीत ग्राहकसेवेसाठी महावितरणने विशेष यंत्रणा उभारावी व महसूल वाढीसाठी अधिक प्रयत्न करावेत. उपलब्ध मनुष्यबळाचा योग्य वापर होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे आदेशही त्यांनी दिले. अधिकाधिक ग्राहकांच्या मीटरचे रीडिंग घेऊन प्रत्यक्ष रीडिंगप्रमाणे वीजबिल दिले जावे व सरासरी वीजबिल देणे टाळले तर वीजबिलांच्या तक्रारी कमी होतील. त्यासाठी स्थानिक स्तरावरील कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपवून नियोजन केले जावे, धनादेशाद्वारे वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांच्या मदतीसाठी विशेष कक्ष स्थापन करावा, अशाही सूचना त्यांनी दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post