नगर जिल्ह्यात 24 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
नगर जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी 6 वाजेपासून शनिवारी दुपारी 12 वाजेपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 24 ने वाढली आहे. तर शनिवारी जिल्ह्यातील 279 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आता 3639 झाली आहे. तर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण रूग्ण संख्या 4997 झाली आहे.

कोरोनाबाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 9 (सिव्हिल हडको , निर्मल नगर, माळीवाडा , पाईप लाईन रोड , गुलमोहर रोड , कायनेटिक चौक , कासारवाडी पंपिग स्टेशन , नगर शहर , शिवाजीनगर कल्याण रोड येथील प्रत्येकी एक) रुग्णांचा समावेश आहे. तर जामखेडमध्ये 2 ( शहर 1, डोण गाव 1), नेवासा 13(तरवडी 1, कुकाणा 1, जैनपुर 3 पाचेगाव 1, नेवासा फाटा 2, सोनई 3, वडाळा 1, चिलेखानवाडी 1) असे एकूण 24 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

जिल्ह्यात शनिवारी 279 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात मनपा 117, संगमनेर 38, राहाता 18, पाथर्डी 14, नगर ग्रामीण 21, श्रीरामपूर 5, कॅन्टोन्मेंट 23, नेवासा 1, श्रीगोंदा 1, पारनेर 10, अकोले 12, राहुरी 7, शेवगाव 4, कोपरगाव 5, कर्जत 3 येथील रुग्णांचा समावेश आहे. शनिवारी 279 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने 3639 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर जिल्ह्यात सध्या 1290 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत कोरोनामुळे 68 जणांचा मृत्यू झाला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post