महापौरांची कोविड सेंटरला भेट; कर्मचारी, डॉक्टरांसह रुग्णांना दिल्या शुभेच्छा


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : स्वातंत्र्यदिनानिमित्त महापौर बाबासाहेब वाकळे यांनी महानगरपालिकेच्या आनंद लॉन येथिल कोविड सेंटरला भेट देऊन तेथील डॉक्टर, कर्मचारी, सिस्टर, उपचार घेत असलेल्या रुग्णांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

महापौर वाकळे यांनी नवीन दाखल झालेल्या, तसेच डिस्चार्ज झालेल्या काही रुग्णांशी चर्चा केली. या वेळी रुग्णांना मिळणाऱ्या सुविधा, जेवणाची व्यवस्था, औषधे, साफसफाई याबद्दल माहिती घेतली.

रुग्णांना चांगली सेवा पुरवत असल्याबद्दल डॉक्टर, महापालिका कर्मचारी यांचे कौतुक देखील केले. तसेच प्रत्येकाने आपली काळजी घ्यावी. चांगले काम करावे, असे अशा सुचना महापौर वाकळे यांनी दिल्या. 

Post a Comment

Previous Post Next Post