अहमदनगर : शहर भाजपतर्फे कोविड सेंटरला दूध वाटप करून आंदोलन


एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : आर्थिक संकटात सापडलेल्या दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला सरसकट 10 रूपये अनुदान व दुध पावडरला प्रति किलो 50 रूपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर शहर भाजपाच्या वतीने आज 1 ऑगस्ट रोजी शहरातील विविध कोविड केअर सेंटरला दूध वाटप करून आंदोलन करण्यात आले. तसेच आंदोलनानंतर जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना दूध दरवाढ मागणी बाबत निवेदन देण्यात आले.

मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दुग्धव्यवसाय हा शेतकऱ्यांचा जोडधंदा आहे. कोरोना लाॅक डाउनमुळे मोठी घट झाली आहे. तर सरकी पेंड व सुग्रास खाद्य यांचे वाढलेले भाव, आणि दुधाचे घसरलेले भाव लक्षात घेता झालेला खर्च ही दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे हा व्यवसाय आज अडचणीत सापडला आहे. बिसलरी पाण्याची बॉटल 20 रुपयाला आणि दूध मात्र 17 रू. या बेताल परिस्थितीमुळे दूध व्यवसाय मोडकळीस निघण्याची वेळ आली आहे. दुध उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. शहरातील हॉटेल्स, चहाची दुकाने बंद असल्यामुळे दुधाची मागणी घटली. आजच्या घडीला खाजगी संस्था व सहकारी दुध संघाकडून दुध २० ते २२ रु. दराने खरेदी केल्या जात आहे. त्यामुळे दुधाचा उत्पादन खर्च सुद्धा निघू शकत नाही. शासनाने १० लाख लिटर दुध २५ रु. प्रती लिटर या भावाने खरेदी करण्याची घोषणा केली होती. परंतु प्रत्यक्षात ७ लाख लिटर दुध खरेदी केल्या जात आहे. गायीच्या दुधाला प्रती लिटर १० रु. अनुदान, दुध भुकटी करिता प्रती किलो ५० रु. अनुदान, शासनाकडून ३० रु. प्रती लिटरने दुधाची खरेदी, सर्व दुधाळ जनावरांचा शासनामार्फत विमा काढण्यात यावा, दूध उत्पादक शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे कर्ज पुरवठा करण्यात यावा आदी मागण्यांसाठी भारतीय जनता पक्ष अहमदनगर यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

बूथ हॉस्पिटल कोविड सेंटर,भिंगार कॅटेन्मेंट हॉस्पिटल कोविड सेंटर,आनंद लॉन्स महापालिका कोविड सेंटर, रोटरी कोविड सेंटर सारस नगर येथे दूध आंदोलन निमित्त येथे दूध वाटप करण्यात आले. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, युवा नेते सुवेंद्र गांधी, संघटन सरचिटणीस विवेक नाईक, कोषाध्यक्ष चेतन जग्गी, सरचिटणीस तुषार पोटे, महेश नामदे, युवा मोर्चा अध्यक्ष महेश तवले, प्रसिद्धी प्रमुख अमित गटणे, मयूर बोचुघोळ, दत्ता गाडळकर, भिंगार मंडल अध्यक्ष वसंत राठोड, केडगाव मंडल अध्यक्ष पंकज जहागीरदार, शहर उपाध्यक्ष शिवाजी दहीहंडे, संपत नलावडे, साहिल शेख, अविनाश सांखला, शशिकांत पालवे, महादेव गाडे, पवन चुटके, पुष्कर कुलकर्णी, शिवा आढाव आदि उपस्थित होते. 

Post a Comment

Previous Post Next Post