मंदिरे उघडण्यासाठी भाजपचे आंदोलन; महापौरांनी केला घंटानाद

 
एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : राज्यात धार्मिक स्थळे ,मंदिरे सुरू करण्यासाठी शहर भाजपतर्फे घंटानाद आंदोलन करण्यात आले. महापौर बाबासाहेब वाकळे, शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र भैय्या गंधे यांच्या नेतृत्वाखाली लक्ष्मी कारंजा येथे व तुकाराम महाराज मंदिर सावेडी येथे घंटानाद आंदोलन करण्यात आले.
 
याप्रसंगी नरेंद्र कुलकर्णी, विवेक नाईक, तुषार पोटे, पुष्कर कुलकर्णी, गजाननराव वाकळे, अशोकराव वाकळे, बाळासाहेब वाकळे, किशोर वाकळे, महेश वाकळे, निलेश जाधव, ऋग्वेद गंधे आदी उपस्थित होते. यावेळी राज्य सरकारच्या भूमिकेचा निषेध  करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post