अमरधामात मृतदेहांची हेळसांड सुरूच; शिवसेनेचे आयुक्तांना निवेदन


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे अमरधाम स्मशानभूमीत मृतदेहांची हेळसांड सुरूच आहे. अमरधामात छोट्याश्या जागेत २५ मृतदेहांचा अंत्यविधी करण्यात आला. या घटनेने संतापलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी थेट आयुक्त श्रीकांत मायकलवार यांचे घर गाठून त्यांना निवेदन दिले. 

हेळसांड करणार्या ठेकेदारावर कारवाईची मागणी त्यांनी केली. अमरधामात आणखी एक विद्युत दाहिनी उभारण्यात यावी, असा आग्रह धरला. शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव, शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, माजी महापौर अभिषेक कळमकर, दत्ता जाधव, मनीष गुगळे, परेश लोखंडे, विशाल वालकर, संजय वल्लाकट्टी, अमित लड्ढा आदी यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post