अहमदनगर : जिल्ह्यात ५६६ नवीन रुग्ण सापडले


एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : जिल्ह्यात मागील २४ तासात नवीन ५६६ कोरोना रुग्णांची नोंद झाली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. तसेच आज ४२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १३ हजार ४७८ इतकी झाली आहे. तर उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३३६५ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ९८, अँटीजेन चाचणीत २३४ आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २३४ रुग्ण बाधीत आढळले आहेत.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ७८, श्रीरामपूर ०१,  कॅन्टोन्मेंट ०४, पारनेर ०३, अकोले ०१, राहुरी ०१, शेवगाव ०१, जामखेड ०५, कर्जत ०१ आणि मिलीटरी ह़ॉस्पिटल ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज २३४ जण बाधित आढळुन आले. यामध्ये मनपा ०४, संगमनेर १७, राहाता ०९, पाथर्डी १९, नगर ग्रामीण २५, श्रीरामपुर १९, नेवासा १४, श्रीगोंदा १८, पारनेर ११, अकोले ०८, राहुरी ०५, शेवगाव ०९, कोपरगाव ५०, जामखेड १३ आणि कर्जत १३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २३४ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा १४१, संगमनेर  १४, राहाता ०६, पाथर्डी ०४,  नगर ग्रामीण २०,  श्रीरामपुर १२, कॅंटोन्मेंट ०५, नेवासा ०३,, पारनेर ०८, अकोले ०५, राहुरी ०७, शेवगाव ०१, कोपरगांव ०६ आणि कर्जत ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज ४२४ रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा १९७, संगमनेर २९, राहाता ०९, पाथर्डी ०८, नगर ग्रा.३७, श्रीरामपूर १२, कॅन्टोन्मेंट १४, नेवासा १३, श्रीगोंदा १९, पारनेर ३०, राहुरी ०७, शेवगाव १२, कोपरगाव १७, जामखेड ०२, कर्जत १८ अशा रुग्णांचा समावेश आहे.
  • बरे झालेली रुग्ण संख्या : १३४७८
  • उपचार सुरू असलेले रूग्ण : ३३६५
  • मृत्यू: २३१
  • एकूण रूग्ण संख्या : १७०७४

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

Post a Comment

Previous Post Next Post