अहमदनगर : मनपात महापौर वाकळे यांच्या हस्ते ध्वजारोहण


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : 74 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अहमदनगर महानगरपालिका मुख्यालयात महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी आयुक्त श्रीकांत मायकलवार, उपायुक्त प्रदीप पठारे, सहाय्यक आयुक्त संतोष लांडगे, सचिन राऊत, नगरसचिव एस. बी. तडवी, नगररचनाचे सहाय्यक संचालक राम चारठाणकर, शहर अभियंता सुरेश इथापे आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महापौर वाकळे यांनी नगरकरांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देतानाच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करता घरातच उत्सव साजरा करावा, असे आवाहन केले. 

Post a Comment

Previous Post Next Post