सोमवारपासून मनपाची कार्यालये सुरू; 50 टक्के कर्मचार्‍यांची उपस्थिती


एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढल्यामुळे बंद करण्यात आलेली महापालिकेची कार्यालये सोमवारपासून (दि.24) सुरू होणार आहेत. मात्र, कार्यालयात 50 टक्के कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत कामकाज करण्याचा व नागरिक, ठेकेदारांना मनपा कार्यालयात प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे व सचिव आनंदराव वायकर यांनी दिली.

मागील दोन आठवड्यांपासून मनपाची कार्यालये बंद आहेत. सुमारे 40 ते 50 मनपा कर्मचारी कोरोना बाधित आढळून आले आहेत. तीन कर्मचार्‍यांचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे कामगार युनियनने अत्यावश्यक सेवा वगळता इतर कार्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला होता. प्रशासनानेही याला सहमती दर्शविली होती. मात्र, आता सोमवारपासून सर्व कार्यालये सुरू होणार आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव शहरात अद्यापही कायम असल्यामुळे कार्यालयात नागरिक व ठेकेदारांना प्रवेश बंद करावा, 50 टक्के कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत कामकाज करावे, अशी मागणी युनियनच्या वतीने आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्याकडे करण्यात आली. याबाबत चर्चा होऊन आयुक्तांनी याला संमती दिली असल्याचे त्यांनी सांगितले.


Post a Comment

Previous Post Next Post