अहमदनगर : शहरात प्रभागनिहाय औषध फवारणी सुुरू


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिकेकडून 40 कर्मचाऱ्यांच्या पथकामार्फत औषध फवारणीचे काम सुरु करण्यात आले आहे. महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या आदेशाने फवारणीचे नियोजन करण्यात आले.

यावेळी मुख्य स्वच्छता निरीक्षक राजकुमार सारसर, एस आय सुरेश वाघ, अविनाश हंस, मुकादम रंगनाथ भालेराव तसेच महापालिकेचे कर्मचारी आदी उपस्थित होते.

महापौर वाकळे म्हणाले की, शहरामध्ये कोरोना रुग्णांची वाढ मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे संपूर्ण शहरामध्ये पुन्हा औषध फवारणी करून घेण्याची गरज आहे. त्यासाठी महापालिकेच्यावतीने 40 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या कर्मचाऱ्यांमार्फत रोज एक प्रभाग अशा पद्धतीने संपूर्ण नगर शहरात फवारणी करण्यात येणार आहे. प्रत्येक प्रभागातील नेमणुकीस असलेले एस आय तसेच केअरटेकर यांच्यावर या प्रभागामध्ये फवारणी करण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. तसेच आरोग्य अधिकारी एन. एस. पैठणकर व मुख्य स्वच्छता निरीक्षक राजकुमार सारसर यांच्या मार्गदर्शनाखाली ही पथकेे काम करणार आहेत. 

29 जुलै च्या महासभेत उपमहापौर मालन ताई ढोणे, स्थायी समिती सभापती मुदस्सर शेख, सभागृह नेते स्वप्नील शिंदे, महिला बालकल्याण सभापती लताताई शेळके, विरोधी पक्ष नेते संपत बारस्कर, भाजप शहराध्यक्ष भैय्या गंधे तसेच सर्व नगरसेवक यांनी फवारणीची मागणी केली होती. त्यानूूसार आज फवारणीचे काम सुरू करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post