निळवंडे धरणावर आकर्षक विद्युत रोषणाई


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : निळवंडे धरणातून प्रवरा नदी पात्रात विसर्ग सुरू आहे. धरणावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. अभियंता मनोज डोके यांनी हे नियोजन केले आहे.

विद्युत रोषणाईमुळे सायंकाळी व रात्रीच्या वेळी मनमोहक दृश्य पाहायला मिळत आहे. याचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. धरणावर पहिल्यांदाच अशा पध्दतीने विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सध्या धरणातून 5684 क्युसेकने विसर्ग सुरु आहे.


Post a Comment

Previous Post Next Post