नियोजित उड्डाणपुलाला स्व. अनिल राठोड यांचे नाव द्या : संभाजी कदम


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : शहरातील नियोजित उड्डाणपुलास दिवंगत अनिलभैय्या राठोड यांचे नाव द्यावे, अशी मागणी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी केली आहे. याबाबत कदम यांनी मनपा आयुक्तांना निवेदन दिले आहे.

स्व. राठोड यांनी नगर शहराचे 25 वर्षे प्रतिनिधीत्त्व केले. नगर शहरात उड्डाणपूल होण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलने, उपोषण केले. शहरातीलच नाही तर जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी सेवा केली. 40 वर्षात त्यांनी ज्या नगर शहराला अहोरात्र सेवा दिली, त्यांचे योगदान नगरकर कधीही विसरु शकणार नाही. नगरचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली असून जनतेला त्यांचे कायम स्मरण रहावे, यासाठी त्यांचे नाव उड्डाणपुलास देण्यात यावे, अशी मागणी शिवसैनिक व सर्व नगरकरांच्यावतीने करत असल्याचे कदम यांनी म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post