येत्या चार दिवसात निर्णय घ्या अन्यथा आम्ही मंदिरे उघडू : वसंत लोढा


एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : राज्यातील उद्धव सरकार झोपलेले आहे. निर्णय घेण्यास असमर्थ आहे. राज्यात आता सर्वकाही चालू झाले आहे. तर मग हिंदू धर्माचे शक्ती स्थान असलेले मंदिरे अजून का बंद ? या नाकर्त्या सरकारला जाग येण्यासाठी भाजप आता आंदोलन करत आहे. जर येत्या चार दिवसात राज्यातील व शहरातील सर्व मंदिरे उघडण्याचा निर्णय घ्या, अन्यथा आम्ही मंदिरे उघडू. याचा जो परिणाम होईल त्यास सरकार जवाबदार राहील, असा इशारा भाजपचे जेष्ठ नेते वसंत लोढा यांनी दिला.

राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी शहर भाजपाच्या वतीने आज सकाळी ‘दार उघड उद्धवा... दार उघड...’ हे अभिनव घंटानाद आंदोलन शहरातील विविध मंदिरांच्या बाहेर केले. भाजपचे जेष्ठ नेते वसंत लोढा यांनी गौरी घुमट येथील तुळजाभवानी मातेच्या मंदिरा बाहेर घंटानाद आंदोलन करत राज्य सरकारला इशारा दिला. सोशल डीस्टंसिंग ठेऊन झालेल्या या आंदोलनात भाजपचे जेष्ठ नेते एल.जी. गायकवाड, मुकुंद वाळके, विलास नंदी, उमेश साठे, सागर शिंदे, उमाप आदि सह्भागी झाले होते.

या आधीही दीनदयाळ परिवाराच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वारंवार पत्र पाठवून राज्यातील मंदिरे उघण्याची रीतसर विनंती आम्ही केली आहे. मात्र अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. आता आम्ही शांत बसणार नाही. राज्य सरकारने मंदिरे उघडो वा न उघडो नेत्या नवरात्र उत्सव दरवर्षी प्रमाणे याच मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा करणार आहोत. असे लोढा यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post