...तर, सुशिक्षित बेरोजगारांची नोंदणी होणार रद्द


एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : राज्य सरकारच्या कौशल्य विकास व रोजगार विभागाकडे नोकरीसाठी नोंदणी केलेल्या सुशिक्षित बेरोजगारांनी येत्या दोन-तीन दिवसात त्यांच्या नोंदणीबाबत अपडेशन केले नाही तर ३१ ऑगस्टनंतर त्यांची नोंदणी रद्द होणार आहे.

महास्वयंम या वेबसाईटवर बेरोजगारांना त्यांच्या नोंदणीचे अपडेशन येत्या तीन दिवसात करण्याचे सांगण्यात आले आहे. सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींपैकी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाकडे नोंदणी केलेल्या उमेदवारांच्या नावनोंदणीचा डाटा ३१ ऑगस्टपर्यंत महास्वयंक वेबसाईटवर अपडेट करण्याचे सांगण्यात आले आहे. या नोंदणी डाटामध्ये उमेदवाराचा मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, आधार नंबर व तसेच नोंदणी मजकुरामध्ये स्पेशल विषय वा अनुभवाच्या नोंदीबाबत माहिती अद्ययावत करण्याचे सांगण्यात आले आहे. असे अपडेशन केले नाही तर संबंधित उमेदवारांची नोंदणी ३१ ऑगस्टनंतर रद्द झाल्यास त्याची जबाबदारी संबंधितांची राहील, असे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त वि. जा. मुकणे यांनी स्पष्ट केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post