एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळणे, घराबाहेर पडताना मास्कचा वापर करणे, लक्षणे जाणवल्यास तात्काळ उपचार घेणे, अशा प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या माध्यमातून आणि प्रत्येकाने योग्य ती काळजी घेत स्वत:चे आरोग्य जपले पाहिजे. हे संकट मोठे असले तरी आपण त्यातून निश्चितपणे बाहेर येऊ, असा विश्वास डॉ. एस. एस. दीपक यांनी व्यक्त केला
साईदीप हॉस्पिटल च्या प्रांगणात झेंडावंदन प्रसंगी ते बोलत होते. रुग्णांचे नातेवाईक व साईदीप हॉस्पिटलचे डॉक्टर्स, नर्स व इतर कर्मचारी या वेळी उपस्थित होते. डॉ. दीपक यांनी साईदीपचे डॉक्टर्स, नर्सिंग, बीव्हीजी ग्रुपचे सफाई कर्मचारी यांचे कौतुक करून त्याना सेवेसाठी पुढील काळातही तत्पर राहून मानवसेवा हीच ईश्वर व देश सेवा असल्याची जाणीव ठेवून कठीण परिस्थितीतही कार्यरत राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
Post a Comment