अमेरिकेचा चीनला दणका; ‘पीएलए’ समर्थक २४ चिनी कंपन्यांवर घातली बंदी


एएमसी मिरर वेब टीम 
वॉशिंग्टन : अमेरिका आणि चीनमधील वाद सध्या वाढताना दिसत आहेत. दक्षिण चीन महासागर, हाँगकाँग आणि तैवानच्या मुद्द्यावर समोरासमोर असणाऱ्या दोन्ही देश आता व्यापार युद्धाकडे पाहायला मिळत आहेत. चिनी सैन्याची मदत करणाऱ्या २४ कंपन्यांवर अमेरिकेनं बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर या कंपन्या अमेरिकेत व्यापार करू शकणार नाहीत. तसंच या कंपन्यांशी निगडित लोकांनाही चौकशीला सामोरं जावं लागणार आहे.

या कंपन्या दक्षिण चीन महासागरात कृत्रिम बेट तया करून सैन्य तळ उभारण्यास चीनला मदत करत असल्याचा आरोप अमेरिकेनं केला आहे. यापूर्वीही दक्षिण चीन महासागरातील चीनच्या सुरू असलेल्या कुरघोडीवरून अनेकदा टीकाही झाली होती. याशिवाय मेरीटाइम अफेयर्स ट्रिब्युनलनेही चीनविरोधात निकाल दिला होता.

सुबी रीफ हा स्पार्टल बेटांचा भाग आहे आणि यावर चीनचं नियंत्रण आहे. परंतु व्हिएतनाम फिलिपिन्स आणि तैवानदेखील यावर आपला दावा करतात. चीननं आतापर्यंत दक्षिण चीन महासागरात अनेक कृत्रिम बेटं उभारली आहेत आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र, युद्धनौका आणि फायटर जेट तैनात केली आहेत. एका अज्ञात फायटर जेटचा चिनी फायटर जेट कसा पाठलाग करत आहे आणि या ठिकाणाहून निघून न गेल्यास त्यावर हल्ला करण्यात येईल असं सांगत असल्याचा एक व्हिडीओ पीपल्स डेलीकडून जारी करण्यात आला होता.

या देशांसोबत वाद
दक्षिण चीन महासागराच्या ९० टक्के भागावर चीन आपला दावा करत आहे. तसंच दक्षिण चीन महासागरावरून फिलिपिन्स, मलेशिया, ब्रुनेई आणि व्हिएतनाम या देशांसोबत चीनचा वाद सुरू आहे. तर दुसरी कडे पूर्व चीन समुद्रात जपानसोबतचा चीनचा सुरू असलेला वाद शिगेला पोहोचला आहे. नुकताच दक्षिण चीन महासागरावरील चीनचा दावाही अमेरिकेनं फेटाळून लावला होता.

काय आहे वाद?
दक्षिण चीन महासागर जागतिक अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा मानला जातो. या ठिकाणी जगातील सर्वात महागडी शिपिंग लेन आहे. या मार्गानं दरवर्षी ३.४ ट्रिलिअन पौडांचा व्यापार होतो. ब्रिटनचाही १२ टक्के समुद्री व्यापार म्हणजेत जवळपास ९७ अब्ज डॉलर्सची आयात-निर्यात याच मार्गानं होतं. १९४७ पासूनच या ठिकाणी वाद सुरू आहे. १९४५ मध्ये जापाननं सरेंडर केल्यानंतर चीननं या ठिकाणी ‘नाईन डॅश’ लाईन तयार केली आणि ९० टक्के भागावर आपला दावा केला. त्यानंतर अनेक देशांनी यावर नाराजी व्यक्त केली होती. तसंच नंतर हे प्रकरण संयुक्त राष्ट्रातही गेलं.

Post a Comment

Previous Post Next Post