सध्या पेंग याची चौकशी आयकर विभागापासून अनेक संस्था करीत असून चौकशीत त्याने आपल्या मदतीने चिनी गुप्तहेर संस्था दिल्लीत निर्वासित म्हणून राहणाऱ्या तिबेटींना लाच देऊन दलाई लामा यांची माहिती काढत होत्या अशी कबुली दिली आहे.

हिंदुस्थानात राहून हवाला रॅकेट चालविणारा पेंग चीनच्या गुप्तहेर नेटवर्कचा एक हेर म्हणूनही काम करीत होता हे उघड झाले आहे. त्याने चिनी नागरिकांसोबत मिळून चिनी शेल कंपन्यांच्या नावाने बँक खाती उघडून सुमारे 1 हजार कोटी रुपयांची मनी लॉण्डरिंग केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. चिनी गुप्तहेर संस्थांच्या निशाण्यावर मजनू का टीला परिसरात राहणारे लामा आणि भिक्षू होते. पेंगने थेट पैसे दिले नाहीत. परंतु आपल्या ऑफिस स्टाफ मार्फत पैसे पाठविण्याचे काम सुरू ठेवले होते.