आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी पण देशात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण


एएमसी मिरर वेब टीम 
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढउतार पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात तेजी असली तरी देशांतर्गत बाजारात मात्र सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आज एमसीएक्सवर ऑक्टोबर महिन्यातील सोन्याच्या दरात ३७० रूपयांची घसरण झाली असून सोन्याचे दर ५२ हजार २५२ रूपये प्रति १० ग्रामवर पोहोचले आहेत. तर चांदीच्या दरातही ०.८ टक्क्यांची घसरण होऊन दर ६७ हजार ३०० रूपये इतके झाले. तर दुसरीकडे ‘स्पॉट गोल्ड’चे दर पाहिले तर ते ५२ हजार ९९० रूपये प्रति १० ग्राम इतके होते.

गेल्या सत्रात सोन्याच्या दरात १.८ टक्क्यांची म्हणजेच ९५० रूपये प्रति १० ग्रामची घसरण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. बुधावारी सोन्याचे दर ५२ हजार ६२२ रूपये प्रति १० ग्रामवर बंद झाले होते. तर गुरूवारी सकाळी सोन्याचा दर ५२ हजार ५५० रूपये प्रति १० ग्राम इतका होता. सुरुवातीच्या सत्रात सोन्याच्या दरामध्ये ३६० रूपयांपेक्षाही अधिक घसरण झाली.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळाली होती. स्पॉट गोल्डच्या किंमतीत ०.५ टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली असून त्याचे दर १ हजार ९४० रूपये प्रति औसवर पोहोचले. तर याव्यतिरिक्त चांदीच्या दरातही वाढ पाहायला मिळाली आणि के २६.९४ डॉलर्स प्रति औसवर पोहोचले. तर प्लॅटिनमच्या दरातही ०.३ टक्क्यांची वाढ झाली असून त्याचे दर ९३४.०१ रूपये प्रति औसवर पोहोचले.

Post a Comment

Previous Post Next Post