एएमसी मिरर वेब टीम
मुंबई : मराठी तसेच हिंदी चित्रपटांमधील आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखले जाणारे आणि उत्तम दिग्दर्शक असलेल्या महेश मांजरेकर यांना खंडणीसाठी धमकी देण्यात आली आहे. त्यांच्याकडे 35 कोटींची खंडणी मागण्यात आली होती. महेश मांजरेकर यांना या वृत्ताच्या खात्रीसाठी संपर्क साधण्यात आला असता त्यांनी आपल्या मोबाईलवर एक मेसेज आला होता असं सांगितलं आहे. या मेसेजबाबत आपण त्वरीत पोलिसांना कळविले असल्याचेही त्यांनी सांगितले. सामना ऑनलाईनने याबाबत वृत्त दिले आहे.
दादर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले असल्याचेही सांगण्यात येत आहे. या व्यक्तीला रत्नागिरी जिल्ह्यातील खे़ड तालुक्यातून ताब्यात घेण्यात आल्याचे कळते आहे. 32 वर्षांचा हा तरुण बुधवारी पोलिसांच्या हाती लागला होता. महेश मांजरेकर यांना रविवारी धमकीचा मेसेज मिळाला होता.
Post a Comment