हिंदूंची गळचेपी थांबवा; पोलिसांनी जनभावनेचा आदर करावा : सुमित वर्मा


एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : हिंदुस्थानचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांच्या अयोध्येतील मंदिराच्या पायाभरणीचा उत्सव सर्व नियमांचे पालन करुन उत्सव साजरा केला जात असतांना मनसे कार्यकर्त्यांना नोटिसा बजावण्याचे कारण काय? असा सवाल करत हिंदूंची गळचेपी थांबवावी, अशी मागणी मनविसेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी केली आहे.

वर्मा यांनी पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले आहे. संपूर्ण देशभरात हा उत्सव साजरा होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या मंदिराचे निर्माण होत आहे. समस्त हिंदू धर्मियांच्या आस्था व श्रध्देचा हा विषय आहे. अनेक वर्षांपासून या उत्सवाची प्रतिक्षा रामभक्त करत आहेत. असे असतांना पोलिसांकडून नोटिसा बजावणे म्हणजे हिंदूंची गळचेपी करण्याचाच प्रकार आहे. सर्व नियमांचे पालन करुन उत्सव साजरा करणार असल्याचे सांगत आजवर आम्ही पोलिस प्रशासनाचा आदरच केला आहे, त्यांनीही आमच्या भावनांचा आदर करावा, असे वर्मा यांनी म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post