सुशांत मृत्यू प्रकरणावर येणार चित्रपट?


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला आता दोन महिने उलटून गेले आहेत. सीबीआय आणि ईडीमार्फत या प्रकरणाचा तपास सुरु आहे. मुंबई पोलिसांनी देखील तब्बल ५६ जणांची चौकशी करुन हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान अशा या गुंतागूंतीच्या प्रकरणात आता चित्रपट निर्माते मात्र रस घेऊ लागले आहेत. सुशांत प्रकरणावर एक उत्तम चित्रपट निर्माण करता येऊ शकतो असं त्यांना वाटतं. यासाठी काही निर्मात्यांनी फिल्म नोंदणी कार्यालयात अर्ज देखील केले आहेत.

ई टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार सुशांत मृत्यू प्रकरणावर आधारित चित्रपट तयार करण्यासाठी आतापर्यंत तीन अर्ज करण्यात आले आहेत. ‘सुशांत सिंह राजपूत – बायोग्राफी’, ‘सुशांत’, ‘द अनसॉल्ड मर्डर मिस्ट्री – राजपूत’, अशी या चित्रपटांची नावं आहेत. यापूर्वी सुशांत प्रकरणावर आधारित एका वेब सीरिजची देखील चर्चा होती. मात्र अॅमेझॉन प्राईमने या केवळ अफवा असल्याचं स्पष्ट केलं.

Post a Comment

Previous Post Next Post