दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार सुशांतचा सन्मान


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतला मरणोत्तर दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. २०२१ च्या दादासाहेब फाळके आंतराराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार महोत्सवात सुशांतला सन्मानित केलं जाणार आहे. दादासाहेब फाळके अवॉर्ड या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरुन ही माहिती देण्यात आली आहे.

‘दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड २०२१ ‘मध्ये सुशांतला मरणोत्तर पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. मात्र, हा सोहळा नेमका कोणत्या दिवशी रंगणार याची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही.

गेल्या महिन्यात कॅलिफोर्निया स्टेट असेंबलीतर्फे सुशांतला मरणोत्तर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. हा पुरस्कार सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्तीने स्विकारला होता. याविषयी तिने सोशल मीडियावर माहितीदेखील दिली होती.


सुशांतच्या चित्रपटांसाठी खास फिल्म फेस्टिव्हलचं आयोजन?
‘बॉलिवूड हंगामा’च्या वृत्तानुसार, सुशांतच्या चित्रपटांसाठी खास एका वेगळ्या फिल्म फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात येणार आहे. सुशांतच्या मृत्यूमुळे संपूर्ण कलाविश्वाला हादरा बसला आहे. विशेष म्हणजे त्याच्या मृत्यूनंतरदेखील त्याच्यावर प्रेम करणारे असंख्य जण आहे. तसंच त्याला आता जो मान, सन्मान मिळतोय तो यापूर्वी मिळायला हवा होता. परंतु, तो मिळाला नाही. त्यामुळेच आता त्याच्यासाठी सरकारद्वारे खास फिल्म फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.


Post a Comment

Previous Post Next Post