मालिका, चित्रपटांच्या शूटिंगसाठी नवीन SOP ची प्रकाश जावडेकरांकडून घोषणा


एएमसी मिरर वेब टीम 
नवी दिल्ली : माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी मालिका आणि चित्रपट निर्मितीसाठी स्टँण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसीजरची (एसओपी) घोषणा केली. चित्रपट निर्मिती करताना शूटिंगच्या दरम्यान काय-काय काळजी घ्यावी लागेल, त्यासंबंधी सूचना करण्यात आल्या आहेत. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर अनिवार्य आहे. करोनाचा फैलाव रोखणे हा या SOP मागचा उद्देश आहे.

चित्रपट आणि मालिकांच्या शूटिंगचे काम आता सुरु करता येईल. यासाठी इंडस्ट्रीतील लोकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागेल. त्याचरोबर मास्क परिधान करावे लागेल. शूटिंग करताना फक्त जे दोन लोक कॅमेऱ्यासमोर आहेत. त्यांना यातून सूट देण्यात आली आहे.

SOP मुळे सेटवर कलाकार आणि कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित वातावरण निर्मितीसाठी मदत होईल. या एसओपीमध्ये स्वच्छता, गर्दी व्यवस्थापन आणि सुरक्षा उपकरणांचाही समावेश आहे.

Post a Comment

Previous Post Next Post