'रियानेच माझ्या मुलाची हत्या केली'


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : सुशांत सिंह मृत्यू प्रकरणामध्ये अमली पदार्थांसंदर्भात धक्कादायक खुलासा झाल्यानंतर आता सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती सुशांतला विष खाऊ घालत होती, असा धक्कादायक आरोप केला आहे. रियानेच सुशांतची हत्या केली असून तिला आणि तिच्या साथीदारांना अटक करावी, अशी मागणी सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी ही मागणी केली आहे.

मागील बऱ्याच काळापासून रिया माझ्या मुलाला विष खाऊ घालत होती. तिनेच त्याची हत्या केली आहे. या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे आणि रिया तसेच तिच्या साथीदारांना लवकरात लवकर अटक करुन त्यांना शिक्षा दिली पाहिजे, असं के. के. सिंह यांनी म्हटलं आहे.


अंमली पदार्थांचे सेवन
अंमली पदार्थ विरोधी पथकाने बुधवारी (२६ ऑगस्ट २०२० रोजी) रियाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिच्या व्हॉट्सअप चॅटवरुन तिचा ड्रग्ज डिलर्सशी संपर्क असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच तिने सुशांतलाही ड्रग्ज सेवनासाठी प्रवृत्त केल्याचं वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. सुशांत मृत्यूप्रकरणात दिवसागणिक नवे खुलासे होत आहेत. रियासंदर्भात नुकताच अमंली पदार्थ सेवनाबाबतचा नवा मुद्दा चौकशीदरम्यान समोर आला आहे. याबाबत ईडीने रियाचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट नुकतेच सीबीआयसोबत शेअर केले होते. नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोनं यामध्ये ड्रग्जचा वापर आणि व्यापार झाल्याचा ठपका ठेवला आहे. रियाच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमधून ती एमडीएमए, हशिश आणि मारीजुना नवाच्या ड्रग घेत असल्याचं समोर आलं आहे. त्याचबरोबर सुशांतलाही तीने याचं सेवन करण्याबाबत सूचना केल्याचं चॅटमधून समोर आलं आहे.

दरम्यान, मंगळवारी रियाच्या वकिलांनी यासंदर्भात एक स्टेटमेंट प्रसिद्ध केलं यामध्ये रियानं आजपर्यंत आपल्या जीवनात कधीही ड्रग्ज घेतले नाहीत, असं म्हटलं आहे. तसेच रिया कधीही आपल्या रक्ताची चाचणी करण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post