भाजप नेत्याची हत्या करण्यासाठी आलेल्या शार्प शूटरला अटक


एएमसी मिरर वेब टीम 
अहमदाबाद : भाजप नेत्याची हत्या करण्यासाठी आलेल्या शार्प शूटरला गुजरातमधील अहमदाबादमधून अटक करण्यात आली आहे. गुजरातमधील दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि अहमदाबाद गुन्हे शाखेने एकत्रितपणे केलेल्या कारवाईत 24 वर्षांच्या शार्पशूटरला अटक करण्यात आली आहे. अहमदाबादच्या रिलीफ रोडवरील व्हिनस हॉटेलमध्ये हा शार्पशूटर थांबला होता. तेथे छापा टाकून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी अद्याप त्याची ओळख उघड केलेली नाही. भाजप नेते गोरधन झाडाफिया यांची हत्या करण्याच्या हेतूने तो शहरात आला होता.

भाजप नेते गोरधन झाडाफिया यांची हत्या करण्यासाठी मुंबईतून आलेला शार्प शूटर अहमदाबाद शहरातील रिलीफ रोडवरील व्हिनस हॉटेलमधील एका खोलीत थांबला असल्याची माहिती मिळाली होती, असे पोलिसांनी सांगितले. मिळालेल्या माहितीच्या आधारे एटीएस आणि अहमदाबाद गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्हे शाखेचे उपायुक्त दीपन भद्रन यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी मध्यरात्रीनंतर व्हिनस हॉटेलमध्ये छापा टाकला. पोलीस आल्याचे समजल्यावर शार्पशूटरने पोलिसांवर गोळीबार केला. मात्र, पोलिसांनी शिताफीने त्याच्यावर मात करत त्याला अटक केली. भाजप नेते गोरधन झाडाफिया यांची हत्या करण्यासाठी शार्प शूटर शहरात आला होता, अशी माहिती एटीएसचे उपायुक्त केके पटेल यांनी दिली. त्याला अटक कली असून पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post