उद्धव ठाकरेंची राष्ट्रीय नेतृत्त्वाची मानसिकता : संजय राऊत


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची राष्ट्रीय नेतृत्त्वाची मानसिकता आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या बैठकीत केंद्र सरकारला घाबरायचं की विरोधात लढायचं हे ठरवा असं सांगितलं. प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्राने आता राष्ट्रीय स्तरावर चमक दाखवायला पाहिजे असं म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे कधीही आडपडदा ठेवून बोलत नाही. पोटात एक आणि ओठावर दुसरं असं कधीच नसतं. उद्धव ठाकरेंनी केंद्राविरोधात लढण्याची तयारी करताना बिगरभाजप राज्यांना आवाहन केलं आहे. या सगळ्यांचं नेतृत्व उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय स्तरावर करावं असं माझं मत आहे. उद्धव ठाकरेंची राष्ट्रीय नेतृत्त्वाची मानसिकता होताना मला दिसत आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

महाराष्ट्राने आता राष्ट्रीय स्तरावर चमक दाखवायला पाहिजे. शरद पवार हे काम करत आहेत पण त्यांच्यासोबत सर्वांनीच केलं पाहिजे, असंही यावेळी ते म्हणाले. संजय राऊत यांनी यावेळी जीम, मंदिरं यासंबंधी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात निर्णय होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली आहे.

सामना अग्रलेखावर बोलताना त्यांनी म्हटलं की, सामना आपली भूमिका मांडत असतो. काँग्रेसला मोठी परंपरा असून सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे. अशा पक्षाच्या अंतर्गत बाबींवर मत व्यक्त करण्यापेक्षा सामनामधून भूमिका मांडली. देशाला मोठ्या विरोधी पक्षाची गरज असून तो काँग्रेस पक्ष आहे. काँग्रेसने वादळातून सावरुन पुन्हा काम सुरु करावं अशी भूमिका मांडली.

Post a Comment

Previous Post Next Post